Bharat

महाराष्ट्र-कर्नाटक विवाद: महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला, राज्याच्या एसटी बसवर दगडफेक

admin

कोल्हापूर बस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एसटी बसवर दगडफेक केल्याने कोल्हापुरात तणावाचे वातावरण पसरले आहे. ही दगडफेक होताच स्थानकात उपस्थित लोकांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मध्यवर्ती बस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एसटी बसवर दगडफेक केली, हा प्रकार  घडताच उपस्थित लोकांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली, दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. हा प्रकार घडल्यानंतर कर्नाटकात जाणारी महाराष्ट्र बस सेवा, तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी कर्नाटकाची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.

काल शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड रक्षक वेदिके संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. या वादाचा परिणाम एसटी महामंडळाच्या बससेवेवर झाला आहे.

बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला करत गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद कोल्हापुरात उमटले. या घटनेनंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. कोल्हापुरात शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले होते.

त्यानंतर आज सकाळी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात महाराष्ट्राच्या बसवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Mumbai: National Medical Commission Reverses Decision to Discontinue CPS Courses After High Court Intervention

Navi Mumbai: Terna Medical College Under Scrutiny for Charging Excessive Deposit Fees

HUGE Mall Dream Bazaar looted by Pakistan locals immediately after Grand Inauguration.

Beware: Delhi Dating App Scams Now Spreading to Mumbai

Global Outcry Over RG Kar Hospital Rape and Murder Case