पुणे औंध येथे राष्ट्रीय सर्वेक्षण दिनानिमित्ताने प्रदर्शन व चर्चासत्र संपन्न.

भीमसेन नाट्यगृहात उपकरणाचे प्रदर्शन व चर्चासत्र आयोजन केले.
पुणे औंध येथे राष्ट्रीय सर्वेक्षण दिनानिमित्ताने प्रदर्शन व चर्चासत्र संपन्न.

पुणे ( औंध ) येथील विश्वेश्वरय्या स्किल ट्रेनिंग अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय सर्वेक्षण दिनानिमित्त जमीन मोजणी उपकरणांचे प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात सोमवारी दिनांक:10/04/2023 रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अधीक्षक सर्वेअर एस. त्रिपाठी, अमृता कुलकर्णी, संतोष शिरसीकर, रविन्द्र पाटील, जयराम सुपेकर, डॉ प्रितम वंजारी, साईटेकचे संचालक सचिन खोत आदी उपस्थित होते. 'दिवसेंदिवस रुंदावत चाललेल्या पुणे महानगराच्या कक्षा आगामी काळात स्थापत्य अभियांत्रिकी, सर्वेअर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर रोजगार संधी उपलब्ध करून देतील' असा विश्वास उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी व्यक्त केला.दरम्यान , सर्वेअर क्षेत्रातील काही प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे महानगरपालिकेमध्ये सहायक अतिक्रमण निरिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल महेश जगदाळे,

आविष्कार दवणे, राहुल डोके या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी एस. त्रिपाठी यांनीही आपले विचार मांडले.विश्वेश्वरय्या संस्थेचे प्राचार्य पांडुरंग सुपेकर यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन करुन आभार मानले. व कार्यक्रम संपन्न झाला.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Buy Website Traffic
logo
The Public Press Journal
publicpressjournal.com