मोबाईल वर बोलत असताना झाली साठ हजाराची चोरी अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल.

कंधार तालुक्यात पोलीस स्थानकाच्या हक्कच्या अंतरावर मोबाईलवर बोलत असताना साठ हजाराची केली चोरी
मोबाईल वर बोलत असताना झाली साठ हजाराची चोरी अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल.

कंधार शहरातील मुक्ताईनगर येथील सेवानिवृत्त कर्मचारी किशन धोंडीबा जाधव हे कंधार पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर मोबाईलवर बोलत थांबले असता. हातातील पिशवी मधील साठ हजार रुपये पिशवीची साईटची एक बाजू कापून अज्ञात चोरट्याने पैसे पळवले.

कंधार शहरातील मुक्ताईनगर येथील सेवानिवृत्त कर्मचारी किसन धोंडीबा जाधव वय 76 वर्ष 20 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता कंधार शहरातील एसबीआय बँके मधून खात्यावरचे साठ हजार रुपये घरगुती कामासाठी उचललेले व त्यानंतर पायाने चालत शहरातील सरकारी दवाखान्यासमोर न्यू मॉर्डन कपड्याच्या दुकानासमोर हातात पैसे घेऊन मोबाईलवर बोलत उभे टाकले असता.

तालुक्याचा सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने पिशवीची एक साईडची बाजू कापून त्यामध्ये ठेवलेल्या दोन हजार रुपयांच्या तीस नोटा असे एकूण 60 हजार रुपये पळविले तेथून बुलढाणा अर्बन बँकेत पैसे भरण्यास गेले असता. पिशवीत हात घातलून बघितला असता तर पिशवी कापलेली दिसली आणि आत मध्ये पैसे नसल्याचे समजले त्यानंतर इकडे तिकडे पाहिले पैसे कोणीतरी चोरले असे लक्षात आले त्यावेळी कंधार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आर. एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.यु. गणाचार्य पुढील तपास हे करीत आहेत.

The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.

happy to Help 9920654232@upi 

Related Stories

No stories found.
Buy Website Traffic
logo
The Public Press Journal
publicpressjournal.com