

Political turn to Pooja Chavan suicide.
महाराष्ट्रात हे काय चालले आहे ?
पुणे ज्याला बोलले जाते " विदयेचे माहेरघर "
ह्याच पुणे मध्ये २२ वर्षीय पूजा चव्हाण बीड जिल्ह्यांमधून शिकण्यासाठी आली होती व ती आपल्या भावासोबत पुण्यात हडपसरला राहात होती.
७ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १ च्या सुमारास पूजा चव्हाणने तिसऱ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हॉस्पिटलला घेऊन जातानाच तिचा मृत्यू झाला.
दुसऱ्याच दिवशी ह्या आत्महत्येचे connection महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या एका मोठ्या नेत्या सोबत असल्याचे समोर आले आहे. social media मध्ये उलटसुलट चर्च्या सुरु झाल्या आहेत.
आत्महत्येला पाच दिवस उलटून गेले तरी अजून पोलीसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही आणि आता भारतीय जनता पक्षाकडून ह्या आत्महत्येची चौकशी झालीच पाहिजे असा दबाव टाकला जात आहे. आतापर्यंत 12 audio clips viral झाल्या आहेत . ह्या clips मध्ये सरळ सरळ एका विदर्भातील एका मंत्र्यांचे नाव समोर आले आहे.
ह्या घटने संबंधातील बीजेपी नेत्या चित्रा वाघ यांचे tweet "पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे updates पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी suo moto अंतर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एवढे पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून वाट कसली पहाताय "
हे tweet करून चित्रा वाघ यांनी सरळ मुख्यमंत्र्यानाच प्रश्न केला आहे आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा tweet करून viral audio clips ची चौकशी करण्यात यावी याबाबत पोलीस महासंचालकांना पत्रं पाठवले असल्याचे सांगितले
त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्येला आता राजकीय वळण लागले आहे.
संबंधित मंत्र्याला अनेक मीडियांकडून contact करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन तीन दिवसांपासून Not Reachable असल्याचे समजले.
पूजा चव्हाण एक dashing मुलगी जी अनेक मुलींची प्रेरणा होती, मुली तिचा आदर्श घेत होत्या ती मुलगी आत्महत्येचा टोकाचा निर्णय कशी घेऊ शकते ? ती कोणत्या तणावाखाली जगत होती ? असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या समोर पडलेले आहेत.
पोलीस जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांचे हात कोणी बांधले आहेत ? सरकार आणि पोलीस मिळून कोणाला वाचवू पाहत आहेत ? आणि का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवी. कारण आपल्याला आपल्या देशामध्ये अजून पूजा चव्हाण होऊ द्यायच्या नाहीत.
पोलिसांनी आपली भूमिका बजावत पूजा ला न्याय मिळवून द्यावा इतकीच अपेक्षा.
The mainstream media establishment doesn’t want us to survive, but you can help us continue running the show by making a voluntary contribution. Please pay an amount you are comfortable with; an amount you believe is the fair price for the content you have consumed to date.
happy to Help 9920654232@upi